पुस्तक रसग्रहण - हॉररस्टोर: लेखक ग्रेडी हॅन्ड्रिक्स
IKEA ह्या दुकानाचं नाव बऱ्याच लोकांना माहिती असेल. विविध फर्निचर,घरात लागणाऱ्या वस्तू, "Do it yourself" ("DIY") तत्वानुसार असलेल्या वस्तू वगैरे विविध प्रकार IKEAत बघायला मिळतात. हि प्रचंड मोठी दुकानं भारत सध्याचं आली असली तरी पाश्चिमात्य संस्कृतीत मोठ्या प्रमाणावर रुजलेली आहेत. रोजगार निर्मितीची अवाढव्य क्षमता, त्यांच्या मागे असलेली प्रचंड भांडवली शक्ती, त्यांची आकर्षक माहितीपुस्तकं (ब्रोशर्स) ह्यावरून कोणाला हॉरर कादंबरी सुचणचं मनोरंजक आहे. हे वस्तुतः ग्राफिक नॉवेल, म्हणजे सचित्र पुस्तक, IKEAच्या ब्रोशर सारखी मांडणी म्हणून ते ऑडिओबुक रूपात ऐकताना थोडा साशंक होतो. पण ह्या ऑडिओबुक बरोबर पुस्तकं सुद्धा मिळाल्याने चित्र पण बघता आली. गोष्ट IKEA सारख्या असणाऱ्या ORSK ह्या अतिप्रचंड दुकानात घडते. बेसिलह्या बॉसच्या सांगण्यावरून एमी आणि रूथ ऍन ह्या दोन महिला कर्मचारी रात्रपाळी साठी दुकानात थांबतात आणि कथेला सुरवात होते. हॉररकॉमेडी ह्या कथाप्रकारात मोडणाऱ्या ह्या कथेचे पैलू हळू हळू उलगडत जातात. बेसिलने त्यांना दुकानात रात्री होणाऱ्या संशयास्पद हालचालीवर देखरेख करायचं काम ...