कोलेट चित्रपट

कोलेट नावाचा चित्रपट बघितला. विसाव्या शतकाच्या सुरवातीला युरोपात कलांना व्यवसायाचं स्वरूप आलं आणि त्यातून ज्या नव्या अभिव्यक्ती निर्माण झाल्या, त्याची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट. छोट्या खेड्यातली मुलगी, १४ वर्ष मोठ्या उमरावाशी लग्न करून पॅरिस मध्ये येते. हा उमराव लेखन, प्रकाशन व्यवसायाची संबंधित असतो. बुडीत चालेल्या धंद्याला, सोडून चालेल्या लेखकांना कंटाळून आपल्या बायकोला तो कथा लिहायला सांगतो पण घोस्ट रायटर म्हणून. आणि तिथून तिचा लेखिका म्हणून प्रवास चालू होतो. हि कथा कोलेट नावाच्या फ्रेंच लेखिकेच्या जीवनावर आहे. ह्यात दिग्दर्शकाने पुरुषसत्ताक वृत्ती, सामाजिक प्रथा ह्यांच्यावर प्रचारकी न होता जे भाष्य केलाय ते लाजवाब आहे. नव्या वर्षात बघितलेला उत्तम चित्रपट.

Comments