#उम्मीदजिंदाहै

सलमानचा टायगर जिंदा है बघितला. थेटर मध्ये जाऊन सलमानचा बघितलेला पहिला चित्रपट. चित्रपटाचा निष्कर्ष एकचं, बॉलिवूडला भारत आणि पाकिस्तान, ह्या दोन्ही देशात सिनेमा विकायचा आहे. शीतयुद्धाच्या काळात हॉलिवूडवाले रशियाला व्हिलन बनवून सिनेमे करायचे तसे आपले बॉलिवूडवाले करू शकत नाहित. उतारा म्हणून बॉलिवूडवाले; फाळणीपूर्वीच्या आठवणी, अमेरिका कशी वाईट आहे, पाकिस्तानी लोकांचा दहशतवादाला कसा पाठिंबा नाही असे विषय हातात घेतात वर दहशतवादाला धर्म नसतो वगैरे नेहमीची वाक्य.

त्यांच्या कडून फक्त एक सोडून कोणतीही अपेक्षा नाही, ती म्हणजे मध्यपूर्वेवर सिनेमा निघालाच तर मराठी गायक रवींद्र साठे ह्यांना सद्दाम हुसेनच्या रोल मध्ये बघायची. कारणं दोन.
१) दोघांचे चेहरे कमालीचे सारखे आहेत.
२) सद्दाम हुसेन ह्या भारताच्या मित्रावर सिनेमाला बनलाच पाहिजे.

#उम्मीदजिंदाहै #ninadkharkar

Comments