तारे आणि फोटो

सध्या लग्नाचा मोसम आहे. फेसबुक लावल्या नंतर शादी डॉट कॉम मध्ये आल्या सारखं वाटतंय असं जो भेटतोय तो म्हणतोय. असंच कोणीतरी तारे आडनावाच्या व्यक्तीने लग्नाचे फोटो टाकून वर 'Star Parivar'अशी कॅप्शन दिल्याचं दिसलं. मला भुजबळांच्या आर्मस्ट्रॉंगची आठवण झाली. इंग्रजांनी राज्य केलं त्याचा बदला तारे, भुजबळ ह्यांच्या सारखी कल्पक माणसं घेतात ह्याचा खरचं अभिमान वाटतो.

त्या तारे नावाच्या माणसाच्या अल्बममध्ये म्हाताऱ्या लोकांच्या एका टोळक्याचा फोटो होता. वर कॅप्शन होती 'Old Stars', हे जरा अरसिक वाटलं, त्या फोटोसाठी दुसरा ऑप्शन द्यावासा वाटला, 'सारे तारे म्हातारे'.

तारे परिवारातल्या लहान मुलांच्या फोटोला 'ये तारा, वो तारा हर तारा, देखो जिसेभी लगे प्यारा', ह्या ओळी चालतील.

तरूण तारे मुलींच्या फोटोला वरच्या कॅप्शन मधले शेवटचे चार शब्द पुरे.

#वाहत्याफोटोतकॉपीटायपूनघेणे

#microfiction

Comments