कॉम्रेड जे: सोव्हिएत गुप्तचर जगाचा प्रवास
पीट अर्ली ह्या पत्रकाराने, कॉम्रेड जे, हे पुस्तकं लिहलं आहे. हे पुस्तक आहे सर्जी ट्रेटयाकोव्ह ह्या सोव्हिएत रशियाच्या गुप्तहेर खात्याच्या मोठ्या पदावर असलेल्या आणि नंतर अमेरिकेत पलायन केलेल्या अधिकाऱ्यावर. ह्या पुस्तकाची सुरवात होते ती एका गूढ प्रसंगा पासून. सर्जी ट्रेटयाकोव्ह हा सोव्हिएत अधिकारी पळून (defection), अमेरिकेत CIA च्या साहाय्याने आला आहे. नेहमीच्या नियमाप्रमाणे दुसऱ्या देशाचा गुप्तचर अधिकार राजाश्रय घ्यायला आला कि सामाजिक अज्ञातवास, नवी ओळख सर्जी ट्रेटयाकोव्हला देण्यात आलेली आहे. अश्या ह्या अज्ञात स्थळी पुस्तकाचा लेखक पीट अर्ली जातो आणि CIA च्या उपस्थित सर्जी ट्रेटयाकोव्हची मुलाखत घेतो.
मुळ इंग्रजी पुस्तक |
ह्या अश्या भरपूर मुलाखती घेऊन कॉम्रेड जे, हे पुस्तकं लिहलंय. लेखक अमेरिकन, CIA च्या संपर्कात राहून घेतलेलया मुलाखती असं ह्या पुस्तकाचं स्वरूप बघता लिखाणाचा कल हा प्रो अमेरिका असणार हे उघड आहे.
ह्या पुस्तकात सोव्हिएत रशिया पासून चालू होणार प्रवास, सोव्हिएतचा अंत, गार्बाचेव्ह युग, सोव्हिएत लष्कर आणि गुप्तचर अंतर्गत बंडाळी ते पुतीन आणि त्याचे ऑलिगार्क ह्यांचा उदय सविस्तर सांगितला आहे. रशियातली अस्थिरता, सार्वजनिक जीवन हे अनुभवलेले सर्जी ट्रेटयाकोव्ह सारखे अधिकारी जेव्हा अमेरिका, कॅनडा सारख्या पहिल्या जगातल्या देशात काम करतात तेव्हा आपलं भविष्य असंचं असावं असं त्यांना वाटण साहजिक आहे. पुस्तकातला एक प्रसंग त्या बाबतील फार बोलका आहे. सर्जी ट्रेटयाकोव्ह आणि त्याची बायको कॅनडातल्या रशियन वकिलातीत कामाला असतात. तेव्हाच सोव्हिएतच पतन व्हायला सुरवात झालेली असते. अनियमित चलन, झटक्यात आलेली छद्मी भांडवलशाही ह्या बाबतच्या बातम्या बघून ते बेचैन होतात. आपल्या मुलीचं आयुष्य अश्या अस्थिर देशात घडू द्यायचं नाही असा विचार करून अमेरिकेत राजश्रय घेण्याचा निर्णय घेतात. सर्जी ट्रेटयाकोव्ह हा निर्णय आपल्या रशियात असलेल्या म्हाताऱ्या आईला समजावतो पण ती रशियातच राहायचा निर्णय घेते. रशिया सोडून येणाऱ्या लोकांच्या गोष्टी बऱ्याच कानावर येत असतात पण त्यांच्या मागे राहणाऱ्या लोकांचं काय होत असेल हा विचार सहज मनात येऊन जातो.

१९५०च्या दशकात सर्जी ट्रेटयाकोव्हच्या वडिलांनी सोव्हिएतच्या अणूऊर्जा कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावली होती, त्याच्या आई आणि आजी ह्या सुद्धा मोठ्या सरकारी पदांवर होत्या. सत्तेच्या केंद्रस्थानी जाण्याचा त्याचा मार्ग इथूनच सुरु झाला होता. सर्जी ट्रेटयाकोव्हने ह्या पुस्तकात एक महत्वाचा मुद्दा सांगितला आहे तो म्हणजे गुप्तचर संस्थांची काम करायची पद्धती. सोव्हिएत संघाची सुप्रसिद्ध KGB, त्यात शिरकाव करण्यासाठी रेड बॅनर संस्था, त्यात टिकून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भानगडी ह्याची सावितर वर्णनं उत्कंठावर्धक आहेत. एक गमतीशीर किस्सा म्हणजे रशियात खाजगी गाड्या कमी, त्यामुळे ह्या संस्थेत प्रवेश मिळाल्यावर पाहिलं काम म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना गाड्या चालवायला शिकवणं. ह्या संस्थेत प्रवेश मिळवायचा एक निकष म्हणजे व्यक्ती जास्त हुशार आणि अगदीचं ढ नसणं, कारण हुशार माणसं स्वतःच्या डोक्याने विचार करू शकतात आणि मठ्ठ माणसं सांगकामे असतात. ह्यातली मधली व्यक्ती गुप्तचर संस्थांना निवडायची असते. हि निवड गुप्तचर अधिकारी आपली माणसे विद्यापीठात पेरून करत. सर्जी ट्रेटयाकोव्हला एका स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅम मध्ये लहान कामगिरी देऊन त्याची निवड करण्यात आली. निवड झाल्यावर सुद्धा जेम बॉण्ड सारखं काही करायला न देता बातम्यांवर नजर ठेवणं, रिपोर्ट तयार करायला देणं या सारखी कामं सर्जी ट्रेटयाकोव्हला देण्यात आली. जसा जसा सर्जी ट्रेटयाकोव्ह वरिष्ठांच्या मर्जीत उतरत गेला तसं तसं त्याचा आतल्या वर्तुळात प्रवेश झाला.
सर्जी ट्रेटयाकोव्ह, सौजन्य: द गार्डियन |
पुस्तकात आत्मकथा सांगण्याचा रोख मात्र सर्वसाधारणपणे एकचं आढळतो, तो म्हणजे अमेरिकन, ब्रिटिश लोकांच्या हेरगिरीला सोव्हिएत उत्तम रित्या तोंड देत होती. वापरलेल्या पद्धती सर्जीला मान्य नसतील तरी रशियन मुल्यांवरचा विश्वास काही त्याचा कमी झाला नव्हता. रशियाशी गद्दारी करणाऱ्या लोकांना देहदंडाची शिक्षा सर्जीला खूप कठोर वाटते पण त्याच्या तो सर्वस्वी विरोधात जात नाही. परिस्थिती शरण वाटलेला सर्जी नंतर काही प्रमाणात योग्य संधीची वाट बघणारा इसम वाटायला लागतो.
सर्जी ट्रेटयाकोव्हने गुप्तचर अधिकारी म्हणून केलेल्या कारवाया सुद्धा सविस्तर आल्या आहेत. कॅनडात असताना बऱ्याच स्थानिक उच्चपदस्थ लोकांकडून त्याने माहिती काढून घेतली. युक्रेन ह्या रशियाची दुखरी नस असलेल्या देशात अणू शस्त्र किती प्रमाणात आहेत तिथं पासून ते कॅनडात किती पाणबुड्या कुठे आहेत हि माहिती त्याने कौशलयाने काढून घेतली. अटलांटिक ते पॅसिफिक महासागराला जोडणारा, कॅनडाच्या ताब्यात असलेला आर्क्टिक महासागराचा पट्ट्याबाबत अतिशय संवेदनशील माहिती सुद्धा मिळवण्यात सर्जीला यश आलं होतं. गुप्तचर विभागांमध्ये माहितीला पैश्यांपेक्षा जास्त मोल असतं, तेव्हा अशी मोठी माहिती मिळवलं म्हणजे जगाचे राजकीय नकाशे बदलण्या एवढं मोठं काम आहे.

पण सोव्हिएत संघाचा अस्त झाला आणि काळाची चक्र उलटी फिरायला लागली. रशियन तेल जगाला उपलब्ध झालं, रशियात माफियांचा राज्य आलं आणि एका नवीन नेत्याचा उदय झाला, व्लादिमिर पुतीन. त्याच्या मर्जीतल्या लोकांची वर्णी वरच्या पदांवर व्हायला लागली, विरोधात जाणारी लोक नाहीशी व्हायला लागली. एक दिवसं आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करून सर्जीणे कुटुंबासकट अमेरिकेत पलायन केलं. आपला हा निर्णय कसा योग्य होता हे संघटना सर्जी आपलं कुटुंब कसं देशभक्त होतं हे सांगायला विसरत नाही.
लेखक: पीट अर्ली |
हे पुस्तक लिहण्यामागचा उद्देश सांगताना सर्जी सांगतो कि,` रशियन गुप्तचर संस्था अमेरिकेला कश्या पोखरत आहेत हे सांगणे हा उद्देश आहे.' शीत युद्धाचा अंत झाला तरीही रशिया अमेरिका, नाटो देश आणि चीन ह्यांना अनुक्रमे १,२ आणि ३ नंबरचे टार्गेट्स मानते, असं तो सांगतो. शीतयुध्दाच्या काळातल्या ऍडव्हर्सरी हा शब्द बदलून टार्गेट हाच काय तो बदल. सर्जीने केलेला अजून एक खळबळजनक आरोप म्हणजे बोरिस येल्त्सिन आणि पुतीनच्या काळात सद्दाम हुसेनच्या ऑइल फॉर फूड कार्यक्रमातून रशियाने आपल्याकडे वळता केलेला पैसा. सर्जी ट्रेटयाकोव्ह पाश्चात्य देशांच्या गुप्तचर संस्थांवर कोणतेही आरोप न करणं आणी फक्त रशियावर केलेले आरोप एकांगी तर वाटतातचं. सर्जी अमेरिकन नागरिक झाल्याने त्याचा तो नाईलाज सुद्धा असावा.
सर्जी ट्रेटयाकोव्ह हा २०१० साली मांसाचा तुकडा अडकून मरण पावला. पुतीन नंतर पत्रकारांशी बोलताना गद्दारांना त्यांची फळ भोगावी लागतील असं बोलून गेले. आता संशयाची सुई रशियाकडे वळली. आता सध्या ब्रिटनलं फितूर झालेल्या सर्जी स्क्रिपाल ह्या रशियाच्या माजी सैनिकी गुप्तचर अधिकाऱयावर आणि त्याच्या मुलीवर ब्रिटन मध्ये विषप्रयोग झाला आहे. ह्यावरून ब्रिटन, अमेरिका आणि नाटो देशांनी रशिया विरुद्ध भूमिका घेतली आहे. एकमेकांच्या देशातल्या राजदूतांना हाकलून लावणे वगैरे शिष्टाचार सध्या सुरु आहेत. रशिया ह्यात सावध भूमिका घेतला दिसतोय. वेळ आल्यावर भूमिका जाहिर करू असं रशियाने म्हटलंय.
सर्जी ट्रेटयाकोव्हची आत्मकथा फार काही देऊन जात नसली तरी गुप्तचर संस्थांची कार्यशैली, माहिती मिळवायची साधनं ह्या गोष्टी वाचण्या सारख्या आहेत. वर्तमान समजून घ्यायला आणि इतिहासात डोकवायला हे पुस्तकं योग्य पथदर्शक आहे.
- निनाद खारकर ©
Comments
Post a Comment