इन्स्टाग्रामवरची स्टोरी
आजचं न्यूयॉर्क टाइम्सनी ईस्टर आयलंड ह्या चिली देशाच्या ज्वालामुखी बेटावर असलेल्या पुरातन स्मारकांवर इन्स्टाग्राम स्टोरी केलेली बघितली. प्रचंड आवडली. प्रत्येक फ्रेमवर मोजके शब्द, मागे बदलणारे व्हिडीओ, लेखाची निवडक टिपणं आणि सहज मिळणारी लेखाची लिंक. वेबसाईटवर गेल्यावर तिकडे लेखा बरोबर इतर मिळणारे 3D नकाशे वगैरे होते. वाचायच्या आधीच काहीतरी मस्त अनुभवतोय असा फील आला. (लिंक-https://www.nytimes.com/interactive/2018/03/14/climate/easter-island-erosion.html)
प्रत्येक माध्यमाची एक भाषा असते. सोशल मीडियावर माहिती सांगायला त्या त्या माध्यमानुसार फॉर्म बदलायला लागतो. भारतात त्या बाबतीत फार काही मला तरी बघायला मिळालं नाही. आपल्याकडे मात्र रेडिओ म्हणजे बोलणारे वर्तमानपत्र, वाहिन्या म्हणजे दिसणारा रेडिओ, इंटरनेट म्हणजे हलणारे वर्तमानपत्र इतपतचं प्रगती. बाकी वाहिन्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर पत्रकारांचे सेलेब्रिटी लोकांच्या बरोबरचे सेल्फी, ऑफिस मधले चहापाण्याचे कार्यक्रम किंवा बातम्यांचे एक-दोन फोटो येत राहतात. आपलं आहे हे असं आहे, बघायचंय तर बघा. नाहितर, मराठी मरतेय म्हणून प्राईम टाईमवर रिकामटेकडे आणून चर्चा करू!
#ninadkharkar
Comments
Post a Comment