लोकशाहीवादि कोण?
चीनचे नेते शी जिंगपिंग हे आशियाचे मंडेला आहेत असे उद्गार थोर सिंगापुरी दिवंगत नेते ली कुआन यु ह्यांनी काढले होते. एका हुकूमशहाला दुसऱ्याचं कौतुक करावसं वाटणार ह्यात नवल नाही, पण भारतात उदारमतवादी अर्थव्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या बऱ्याच लोकांना ली हे आदर्श नेते वाटतात ह्याचं नवल वाटतं.
सांगायचा मुद्दा म्हणजे चीन आणि सिंगापूर मध्ये होणाऱ्या निवडणुका गौडबंगाल आहेत. चीन मध्ये नुकतेच शी जिंगपिंग हे अमर्याद सत्तेत राहवेत अशी तरतूद झाली आणि सिंगापूर मध्ये सुद्धा ली ह्यांची पार्टी, त्यांची पोरबाळं सत्तेत बऱ्याच वर्षांपासून सुखाने नांदत आहेत.
आता चीन विरुद्ध भूमिका घेणारी पाश्चिमात्य माध्यमं सिंगापूर हे भांडवलशाही राष्ट्र म्हणून त्याला सूट देत होती का? मुख्य प्रश्न उदारमतवाद आहे की my bastard v/s your bastard debate असा प्रश्न पडतो.
#xijingping #leekuanyew
Comments
Post a Comment