हा खेळ बाहुल्यांचा! :)
आज काल आपण
सगळे दिवस भर काहीनाकाही करत असतोच त्यामुळे मित्रांना भेटायला वेळ कुठला मिळणार?
अश्यावेळी आपल्या मदतीला कॉम्पुटर, मोबईल सारखी यंत्रच धावून येतात. फोन लावायचा
अवकाश, समोरची व्यक्ती आपल्या समोर हजर. आता फोन लावायला सुद्धा वेळ नसणाऱ्या
व्यस्तग्रस्त वल्लीन साठी आता व्हात्साप्प सारखे मेसेंजरस आलेत, आपण मेसेज करून
ठेवायचा, सामोरच्याला वेळ मिळेल तेवा तो रिप्लाय देईल, आपल्याला वेळ असेल तेव्हा
आपण. ह्या कसरती मध्ये आपण एका प्रकाराला गृहीतच धरलं आहे, इमोटीकॉंन्स! सहज
उपलब्ध असलेली गमतीशीर चिन्ह! ते कसे जन्मला आले? का आले? ह्या चा विचार केलाय का
कधी?
आपल्याला
अगदीच शुल्लक वाटणाऱ्या इमोटीकॉंन्स मागे छोटासा का होईन इतिहास आहे. अमेरिकेतल्या
कार्नेगी मेलॉन विद्यापीठात सगळ्यांना एकत्र जोडण्यासाठी एक संगणकीय मेसेजबोर्ड
होता. या संगणकीय मेसेजबोर्डावर सर्व प्रकारचे मेसेज यायचे त्यातले जोक्स, आणि
गमतीत माररेल्या कोपरखळ्या लोकांना सहज समजाव्या म्हणून विराम चिन्हांच्या मदतीने
काही नवीन चिन्हे तयार करण्याची कल्पना तिथले संगणकाचे जेष्ठ तज्ञ डॉक्टर फाह्ल्मान
यांच्या डोक्यात आली. लगोलग त्यांनी
“खालील
चिन्हानचा जोक्स मार्क्स म्हणून वापर व्हावा अशी मी मागणी करतो
:-) :-( “ असा
मेसेज संगणकीय मेसेजबोर्डावर पाठवला. तो दिवस होता १९ सप्टेंबर १९८२.
मजेचा भाग असा
की हे मुळचे मेसेज गहाळ झाले आणि सापडले ते १० सप्टेंबर २००२ रोजी, जवळ जवळक २०
वर्षांनी. (डॉक्टर फाह्ल्मान यांच्या या क्रांतिकारी शोधची आठवण म्हणून २००७ साला
पासून कार्नेगी मेलॉन विद्यापीठातर्फे, विद्यापीठाच्या विद्यार्थानसाठी स्पर्धा
आयोजित केली जाते. ह्या स्पर्धेत विद्यार्थांना नवीन नवीन शोध लावण्यास प्रोत्साहन
दिले जाते.)
मधल्या काळात
बरेच नवीन इमोटीकॉन्स आले होते, ते नवीन आलेले इमोटीकॉन्स फक्त सध्या विरामचिन्हान
पुरते मर्यादित न राहता, त्यात सुद्धा बरेच प्रकार तयार झाले. पहिला
प्रकार म्हणजे आपल्या नेहमीच्या वापरातले J. L असे पश्चिमात्य इमोटीकॉन्स, दुसरा प्रकार
म्हणजे डोळ्यांवर भर असलेले (0 _0) ह्या सारखे जपानात
जन्माला आलेले इमोटीकॉन्स,
तिसरा प्रकार म्हणजे लहान चिन्हांनी बनवलेलं मोठं इमोटीकॉन्स उदाहरणार्थ
{^_^}
.असे. ढोबळमानाने जरी असे तीन प्रकार दाखवता
आले तरी नवीन नवीन संवाद साधणाऱ्या माध्यमांन मध्ये नवीन चिन्हे तयार होतच आहेत.
इमोटीकॉन्स चा
शब्दशः अर्थ म्हणजे भावना व्यक्त करण्या साठी, हावभाव असलेली चिन्हे. दैनंदिन जीवनात आपण इमोटीकॉन्सना
इतका ग्राह्य धरलंय की ते संगणकाच्या माध्यमातून संवाद साधण्याच्या व्याकरणात
जावून बसले आहेत हेच आपण विसरतोय (म्हणजे वाक्य संपवताना पूर्णविरामाच्या जागी :)
हे चिन्ह, तुम्ही करता का असं?). अमेरिकेच्या पॉव संशोधनसंस्थेला
त्यांनी केलेल्या संशोधना मध्ये असं आढळलं की परीक्षेत काही मुलांनी विरामचिन्हे
वापरण्या ऐवजी चक्क इमोटीकॉन्स
वापरले होते, हे इमोटीकॉन्सच वेड कुठपर्यंत जावून पोहचलं आहे हे ह्या उदाहरणातून
समजत.
फेसबुक आणि whatsapp वर गप्पा मारताना नुसते शब्द वापरून संवाद बोरिंग
वाटू शकतो. त्याच्या ऐवजी अक्षरां बरोबर इमोटीकॉन्सवापरले तर रंजकता वाढू शकते. तुम्हाला मी काय
सांगतोय ह्यावर विश्वास बसत नसेल तर एक प्रयोग करून बघा. एक मेसेज कोणताही इमोटीकॉन
न वापरता तुमच्या मित्राला पाठवा, आणि तोच मेसेज इमोटीकॉन्स वापरून दुसऱ्या
मित्राला पाठवा आणि दोघांच्या प्रतिक्रिया घ्या, निश्चित वेगळ्या असतील|!
समोरा समोर
बोलताना, जसं चेहऱ्याच्या स्नायूनचा वापर करून आपलं म्हणणं, भावना अधिक चांगल्या प्रमाणे समोरच्या पर्यंत पोहचवता येतं; तसंच इमोटीकॉन्सचा वापर करून chatting करताना कराता येतं. ह्यात सुद्धा smilies आणि इमोटीकॉन्सवेगळे बरं का! इमोटीकॉन्सम्हणजे चेहर्याचे भाव दाखवणारे मेसेंजर्स मधील
संवादत वापरले जाणारी चिन्ह आणि smilies म्हणजे चेहर्याच्या रुपात दिसणारया कोणत्याही
आकृती. उदाहरण म्हणजे चेहऱ्याच्या आकाराचे चेंडू smiles म्हणता येतील, इमोटीकॉन्स नाही!
(वर दिलेले इमोटीकॉन्स उदाहरणार्थ आहेत, असे आता बरेच उपलब्ध आहेत)
तुम्हाला गंमत
वाटेल पण इमोटीकॉन्समध्ये सुद्धा बराच संवादाच्या अंगाने खूप नाही तरी बर्यापैकी संशोधन
झालाय. अगदी, आपले
बोलण्यातले हावभाव इमोटीकॉन्समध्ये येतात
का? इथपासून ते, सर्वात जास्त इमोटीकॉन्स कोण वापरतात? इथपर्यंत. एका
संशोधनात तर असं आढळलं की, पुरुष हे
महिलावर्गा पेक्षा अधिक इमोटीकॉन्स वापरतात, ह्याच्या
मागचे साधं कारण म्हणजे सर्व तथाकथित प्रगत (?) समजात, पुरुषांनी भावना व्यक्त करणं हलक्या दर्ज्याच
समजलं जातं! ह्याला पर्याय
म्हणून खाजगीबाब असणाऱ्या chatting मध्ये इमोटीकॉन्स मधून भावना व्यक्त करणे.
ह्या इमोटीकॉन्स मध्ये सुद्धा विविधता आढळते. जपान च्या इमोटीकॉन्स, ईमोजि (emoji) मध्ये जास्तभर डोळ्यांच्या संवादावर असतो, उदारणार्थ >. <, ^.^ हे बघा आणि :) :( हे बघा, गूगलवर तुम्ही शोधलं तर असे बरेच फरक सापडू
शकतील. वरच्या उदाहरणात पहिला प्रकार ईमोजि आहे, जपान सारख्या, बोलताना दुसरयाविषयी आदरभाव दाखवणाऱ्या
संस्कृती मधून आलेले हे ईमोजी डोळ्यांनी जास्ती बोलतात. त्याच्या विरुद्ध म्हणजे
नंतरचे अमेरिकन इमोटीकॉन्स, ज्यात चेहरा दाखवण्यावर जास्त भर आहे.
इमोटीकॉन्सच्या बाबतीत एक मजेशीर गोष्ट म्हणजे, सकारात्मक संवादा मध्ये इमोटीकॉन्सवापर जास्त
होतो, असा आढळून आलं आहे. रोजच्या जगण्यात आपल्याला कितीही त्रासिक चेहरा करून काम
करावं लागलंतरी आभासी जगात उत्तम दिसावं हि तर ह्या मागची भावना नसेल? वापरकर्त्याला संवादासाठी स्वतंत्र आणि खाजगी
वैयक्तिक जागा पुरवणाऱ्या chat rooms ह्या नवीन व्यक्तिमत्व तयार करताना दिसतात. सोप्या भाषेत सांगायचं झालंतर आपण खऱ्याखुऱ्या आयुष्यात जसे
आहोत त्या पेक्षा वेगळे दिसण्यासाठी सुद्धा इमोटीकॉन्सचा वापर होतो, (हे म्हणजे सुपरहिरो खरी ओळख
लपवतात तसाच प्रकार म्हणायचा!)
इमोटीकॉन्सच्या
दिसण्यामध्ये वय, वंश, लिंग अश्या गोष्टी दिसत नाहीत ह्या मगच कारण म्हणजे
कोणत्याही स्तरातली व्यक्ती त्यांचा वापर करताना इमोटीकॉन्स मध्ये स्वतःलाच बघते,
त्यात त्याना दुसरे दिसलेले कसे चालतील. उदारणार्थ बनवलेला इमोटीकॉन्स आफ्रिकन आणि
भारतीय दोघेही पावरणार असतील तर इमोटीकॉन्स त्या दोघांना आपला वाटेल असाच हवा, कोणत्याही
साचेबंधात नसलेला. दिसणारे इमोटीकॉन्स गोल गोल
चेहरे असतात म्हणून वापरायला मजा येते, नाही तर एखाद्या दाढी मिशीवाल्या बाप्याचे
राकट इमोटीकॉन्स तुम्ही तरी वापरले असते का?
आपण बोलताना
जसं जवळचा मित्र किंवा मैत्रीण बेस्ट फ्रेंड असलीतर अधिक मोकळेपणाने, हातवारे करून बोलतो तसंच इमोटीकॉन्सच्या बाबतीत. मैत्री जेवढी अधिक घट्ट तेवढा इमोटीकॉन्सचा वापर
जास्त. ह्यात एक नकारात्मक बाब अशी की, संवाद्कर्ता प्रत्यक्षात एखादी भावना
न-अनुभवता ती इमोटीकॉन्सद्वारे व्यक्त करू शकतो. भावना खरी की खोटी
हे ओळखणे कठीण आहे, असं असली तरी ह्या माध्यमात आपल्या भावना गुप्त ठेवण्याच
मिळणारं स्वातंत्त्र्या कडे दुर्लक्ष करून नाही चालणार. आभासी जगाचा थोडातरी
प्रभाव ह्या तंत्रद्याना वर हवा ना ?
हे इमोटीकॉन्स मेस्स्जेसचा इतका
अविभाज्य भाग झाले आहेत की ते जर नाही वापरले तर त्याचा वेगळाच अर्थ लागू शकतो
उदाहरणार्थ
तू कसा आहेस? J
मी बरा आहे L
वरचे संवाद बघा ह्या दुसऱ्या
मेसेजमध्ये उत्तर देणारा बरा आहे सांगतोय पण ते त्याला म्हणायचं नाहीहे लगेच दिसून
येतं.(म्हणजे चक्क खोटं बोलता येत तर!)
आपल्या आजुबाजूच्या गोष्टींच्या इमोटीकॉन्सरुपी
प्रतिमा मोबाईल आणि इंटरनेट वर गप्पा मारताना असल्यास त्याचा फायदा संवाद साधताना
होतो असं बऱ्याच संशोधकांच मत आहे. ह्यात गमतीचा भाग असा की ह्या इमोटीकॉन्स बनवणारे
सगळे पाश्चिमात्य आणि जपानी आहेत. त्या मुळे त्यांनी तयार केलेले इमोटीकॉन्सत्यांच्या
त्यांच्या भोवतालचं जाग दाखवतात, त्यात असलेल्या भावना भारतीय नक्कीच नाहीत त्या
जागतिक असतील. आत्ता आत्ता काही प्रमाणात भारतीय जीवनपद्धती मधल्या गोष्टी
एमोटीकॉंन्स मध्ये दिसायला लागल्या आहेत. उदाहरणार्थ आपण सर्व जण वापरात असलेल्या
Whatsapp मध्ये भारताचा झेंडाच नव्हता, बऱ्याच भारतीयांनी त्या बाबत तक्रारी
केल्या नंतर भारताचा झेंडा बाकी इमोटीकॉन्सच्या तक्त्या मध्ये डौलाने फडकू लागला.
अर्थात तो झेंडा सुद्धा भारतीय लोकांनी बनवला नाही, पाश्चिमात्य लोकांनीच बनवला.
समोरच्याला
चाचपडून संवाद चालू ठेवण्यसाठी इमोटीकॉन्सची गरज आहे, आणि ती वाढत राहणार आहे. हे इमोटीकॉन्स गपचूप आपल्या भाषेत सुद्धा जावून बसतील आणि
आपल्या लेखी भाषेचा भाग बनतील कि काय असा अंदाज बरेच संशोधक व्यक्त करतायत. क्रिश३
च्या वेळी सुद्धा त्या चित्रपटाचे smilies, facebook वर दाखल झाले होते. अर्थात बाजाराला सुद्धा इमोटीकॉन्स,
smilies प्रकारांची दखल घ्यावी लागते हे विशेष.
शेवटीकाय समोर समोर कोणाला डोळा मारायचा झाला आणि मारता येत नसेल तर सरळ chatting करताना, ;) पाठवून द्यावे, एवढी सगळी पोपटपंची झाल्यावर आपलं काम
झाल्याशी मतलब :p
तळ टीप-
हर्मन विल नावाच्या मोठ्या
अमेरिकन लेखकाची `द व्हेल’ नावाची जगात गाजलेली कादंबरी आहे. त्या कादंबरीची भरपूर
भाषांतरं झाली आहेत. रेडियो, टी. व्ही., मासिक, कॉमिक्स, ग्राफिक्स नोवेल अश्या सगळ्या माध्यमात ती कादंबरी
आली आहे. काही वर्षान पूर्वी ‘इमोजी डिक’ नावाचा उपक्रम,
लोकांनी, स्वतः पैसे उभारून चालू केला. का होता हा उपक्रम? तर चक्क ‘द व्हेल’
कादंबरीचं इमोजीमध्ये (जपानी इमोटीकॉन्स) भाषांतर. तब्बल
८०० लोकांनी ३,७९५,९८० सेकंदात आणि १०,००० ओळींत का उपक्रम
पूर्ण केला. आता तर हे भाषांतर चक्क पुस्तक म्हणून इंटरनेटवर विकत सुद्धा मिळते.
मस्तच...👍👍👌👌
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete