ले ऑफस आले

दोन तीन दिवसांपूर्वी हफिंगटन पोस्ट आणि बझफीड ह्या बलाढ्य प्रसारमाध्यम कंपन्यांनी अमेरिकेत कर्मचारी कपात केली आहे. हवा तेवढा नफा निर्माण होत नाही ही बाब त्यांनी सांगितली आहे. ह्या कर्मचारी कपातीत त्यांच्या नामवंत पत्रकारांना सुद्धा नोकरी गमवावी लागली आहे. ह्या बाबत आज जरा वाचत होतो तर प्रसारमाध्यम तज्ञाचे बरेच दावे समोर आले. माध्यम कंपन्यांनी research & development च्या नावाखाली फक्त तंत्रज्ञानवर पैसा खर्च केला, नवीन माहिती, ज्ञान ह्यावर केला जाणार पैसा अगदी नगण्य आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे पूर्वी मराठी पेपरात राजकारणी लोकांच्या घरच्या लग्नाची वर्णनं येत तीच आता 24तास बातम्या म्हणून background ला गाणी लावून दाखवतात. फक्त माध्यम बदल होणार प्रसारमाध्यमांना नफा कसा मिळेल? पत्रकारांनी सेल्फी साधना केली तर 'गिर्हाईकांना' उपयुक्त माहिती कशी मिळेल? ह्यातून पत्रकार बेरोजगार झाले तर दोष कोणाचा?

-निनाद खारकर

Comments