जे के रॉलिंगचं जग
लेखिका जे के रॉलिंगने निर्माण केलेल्या हॅरी पॉटरच्या जगाची ओळख मला आधी चायनीज भाषेतून झाली. त्याचं झालं असं तेव्हा CD प्लेअरचा जमाना होता. माझ्या बाबांनी परदेशातून नवीन CD प्लेअर आणला होता, तेव्हा त्या बरोबर बघायला म्हणून स्वस्तात मिळाली ती CD आणली होती. त्या मागचा विचार सरळ असेल, पैसे वाचावे आणि (मराठी माध्यमात शिकणाऱ्या मला) इंग्रजी भाषा असली तरी ती समजण्याचा प्रश्न नव्हता. मी ती चित्रपट बघितला आणि जाम आवडला. त्या नंतर पुस्तक वाचायची इच्छा झाली. त्या काळी इंग्रजीशी ३६चा आकडा होता म्हणून मराठी भाषांतर केलेलं पुस्तकं मिळवून वाचलं. हॅरी पॉटरचे नंतर चित्रपट बघितले ते सुद्धा हिंदी भाषेत. त्या चित्रपटांचं हिंदी भाषांतर सुद्दा इतकं जबरदस्त आहे की बघताना ह्या विषयावर इंग्रजीत काही काम केलंय ह्याची आठवणचं होत नाही. ह्या कलाकृती बरोबर माझी अजून जोडलेली आठवण आहे. ती म्हणजे माझं डोळ्याचं ओपरेशन झालेलं तेव्हा एक आठवडा काही बघायचं नव्हतं तेव्हा दिवस रात्र हॅरी पॉटर सिरीजची ऑडिओबुक्स ऐकण्यात घालवली आहेत. सकाळी उठल्या पासून ब्रेक घेत घेत पूर्ण गोष्ट ऐकायला फार मजा वाटली होती.
तसं बघायला गेलं तर जसा सर्वसामान्य परीकथांचा आलेख असतो तसाच ह्या कथेचा आहे. अनाथ मुलगा, वाईट वागणूक देणारे नातेवाईक, एका रात्रीत जग बदलण्याचे प्रसंग, गार्डीअन अँजल इत्यादी. मला ह्यात आवडणारी गोष्ट म्हणजे लेखिकेने तयार केलेली उपकथानक, प्रत्येक व्यक्तिरेखेला दिलेला न्याय आणि नाझीवादाच्या शुध्दीकरणाच्या मिथकाला दिलेला वेगळा साचा. उपकथानकं तर एवढी आहेत की पॉटर फॅन्सनी Voldemort: The true heir आणि Snape and Marauders वगैरे फॅन मूवीस बनवले आहेत.
बरेचसे लेखक आपल्या प्रसिद्ध पात्रांना आपल्या नंतर कोणीही वापरू नये म्हणून मारून टाकतात. अर्थार कॉनन डॉएल ह्यांनी शेरलॉकला असंच मारून टाकलं होतं पण रसिकांच्या रोषाला कंटाळून परत सुद्धा आणलं होतं. रॉलिंग ह्यांनी सध्या असं काही केलं नाहीये. त्यांचं Harry Potter and Cursed Child वाचूनतरी असं वाटत नाही. उलट ह्यात त्यांनी बाप झालेला हॅरी अजिबात हिरो वाटत नाही.
बरेचसे लेखक आपल्या प्रसिद्ध पात्रांना आपल्या नंतर कोणीही वापरू नये म्हणून मारून टाकतात. अर्थार कॉनन डॉएल ह्यांनी शेरलॉकला असंच मारून टाकलं होतं पण रसिकांच्या रोषाला कंटाळून परत सुद्धा आणलं होतं. रॉलिंग ह्यांनी सध्या असं काही केलं नाहीये. त्यांचं Harry Potter and Cursed Child वाचूनतरी असं वाटत नाही. उलट ह्यात त्यांनी बाप झालेला हॅरी अजिबात हिरो वाटत नाही.
आता नुकताच fantastic beasts ह्या चित्रपटामध्ये नागिनीचं पात्र इंडोनेशियन पार्श्वभूमीवरून घेतक्याचं रॉलिंगचं ह्यांनी सांगितलं आणि एकच गदारोळ उडाला. अमिश त्रिपाठी सारख्या भारतीय लेखकांनी ते भारतीय मिथकांच्या वरून घेतल्याचा दावा केलाय. अश्या अनेक लोककथा रॉलिंगचं ह्यांनी वापरल्या आहेत, त्या सुद्दा क्रेडिट न देता. पण हॅरी पॉटर सारखी कलाकृती निर्माण केल्यामुळे त्यांना माफ करता येईल.
हॅरी पॉटर जगप्रसिद्ध होण्यामागे एक महत्वाचं कारण म्हणजे त्याला जागतिक दर्जा देण्याचा प्रयत्न. मुख्य भूमिकेत गोऱ्या व्यक्ती असल्यातरी, दुय्यम भूमिकांमधून भिन्न वंशीय व्यक्ती दिसत राहतात.
जादू हा हॅरी पॉटर सिरीजचा महत्वचा भाग असलातरी तो केंद्रबिंदू नाही. तसं केलं असतं तर कथानक फारच निश झालं असतं. सर्वसामान्य वाचकांनी त्याच्याशी रिलेट केलं असतंचं असं नाही. मानवी भावभावना, ईर्षा, मत्सर, प्रेम ह्यात थोडीफार जादू आहे आणि त्यातच मजा आहे. अजूनही.
- निनाद खारकर
Nice analysis
ReplyDelete