White Roses
रसेल फ्रीडमन ह्यांनी लिहलेलं,` We Will Not Be Silent: The White Rose Student Resistance Movement That Defied Adolf Hitler'. अश्या नावाचं पुस्तक आज चाळत होतो. पुस्तकाच्या नावावरून विषयाची कल्पना येईल. भरपूर मोठे ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्स, गुळगुळीत कागदावर छापून झकास टापयो वापरला होता. त्यातला एक किस्सा लक्षात राहिला, व्हाईट रोज चळवळीचा नायक हिटलरच्या बाल सेनेत होता. ह्या बालसेने तर्फे गिर्यारोहण, शिबिरं, संचालन, समूहगीतं असे उपक्रम राबवले जात. ह्यात मुलींची तुकडी वेगळी होती, त्यात त्यांना उत्तम गृहिणी बनणे, राष्ट्रासाठी दुय्यम दर्जाची कामे करणे असं प्रशिक्षण देत. ह्यात त्यांना एक महत्वाची शिकवण होती ती म्हणजे राष्ट्रविरोधी यहूदी लोकांनी लिहलेलं साहित्य फेकून देणे. कलाकृती एकदा राष्ट्रविरोधी घोषित केल्या कि लोकं त्यावर फारच विचार न करता बहिष्कार टाकतात हे साधं लॉजिक त्या मागे असावं. आपल्याकडे सध्या वेगवेगळ्या सामाजिक गटांचे सेन्सॉर हे तत्व मोठ्या प्रमाणावर वापरताना दिसतात. इतिहास सगळ्याची नोंद घेत असतो हे बरेच जणं विसरतात, काळ विसरत नाही.
Comments
Post a Comment