राज्यसभा टीव्हीच्या आठवणी
नवीन उपराष्ट्रपती आल्यावर ते राज्यसभा टीव्हीचा ताबा सुध्दा घेतील. हमीद अन्सारींच्या कार्यकाळात राज्यसभा टीव्हीने कायापालट करून जागतिक दर्जाची वहिनी झाली. पत्रकारिता आणि नंतर UPSCसाठी अभ्यास करताना बऱ्याच वेळा फक्त राज्यसभा टीव्ही बघायचो. मीडिया मंथन, India's world, Economy Today, Law of the land, गुफ्तगु, The Policy Watch, Big Picture, State of the Economy, सरोकार हे राज्यसभा टीव्हीचे सगळे कार्यक्रम वेळ मिळेल तेव्हा बघायचो. ह्यातल्या बऱ्याच कार्यक्रमांच्या मी नोट्स काढल्या होत्या. बरेच दिवस वाचन आणि राज्यसभा टीव्हीचे कार्यक्रम हाच उद्योग होता.
Big Picture हा राज्यसभाटीव्ही चा कार्यक्रम करणारे गिरीश निकम नावाचे जेष्ठ पत्रकार नोटबंदी झाली त्या दिवशी कार्यक्रम करून बसले असता, स्टुडिओ मध्येच त्यांना हार्ट अटॅक आला. नंतर थोड्याच वेळात राज्यसभा टीव्हीवर जाहिर करण्यात आलं कि त्यांचं निधन झालं. राज्यसभा टीव्ही बघणाऱ्या बऱ्याच लोकांना हा धक्का होता. स्पर्धा परीक्षांना बसणारी बरींच मुलं हे कार्यक्रम बघत असावी कारण स्पर्धा परीक्षांच्या वेबसाईटवर, त्या दिवशीच्या त्यांच्या youtubeवर अपलोड केलेल्या व्हिडियोवर बऱ्याच मुलांनी श्रद्धांजली दिली होती.
हमीद अन्सारी ह्यांनी टिका सहन करून पत्रकारितेतली मोठी नावं, आधुनिक तंत्रज्ञान राज्यसभाटीव्ही साठी आणलं होतं हे वाचलं होतं. ह्या साठी हमीद अन्सारी ह्यांचेे आभार.
नवीन उपराष्ट्रपती राज्यसभाटीव्हीची परंपरा चालू ठेवलीत अशी आशा ठेवूया.
Comments
Post a Comment