Book Review- Four Miles To Freedom: Escape From A Pakistani POW Camp

नुकतंच फेथ जॉन्सन ह्या कॅनडियन लेखिकेचं Four Miles To Freedom: Escape From A Pakistani POW Camp (स्वातंत्र्यासाठी चार मैल: पाकिस्तानी युद्धकैद्यांच्या तळातून पलायन) वाचण्यात आलं. लेखिका पत्रकार आहेत, भारतीय सैन्यातल्या निवृत्त अधिकाऱ्याशी त्यांचं लग्न झालंय.  भारतीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन हे पुस्तक लिहिलंय.  एकूणच त्यांची ह्या विषयातली वैयक्तिक गुंतवणूक त्यांच्या लिखाणात उतरली आहे.
 फेथ जॉन्सन




पुस्तकाची गोष्ट १९७१ च्या पाकिस्तानात अडकलेल्या भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची आहे. दिलीप परुळेकर  ह्या भारतीय हवाई दलाच्या, फायटर प्लेनच्या चालकाचं विमान पाकिस्तानातलय एका गावात कोसळतं. गावातले लोक त्यांना पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या हवाली करतात. तिथून त्यांची रवानगी युद्धकैद्यांच्या तुरुंगात होते. तुरुंगात हरीश सिंग, मालविंदर सिंग गरेवाल हे भारतीय सुरक्षा दलातले अधिकारी युद्धकैदी म्हणून असतात. इथून युद्धकैदी म्हणून त्यांचा प्रवास सुरु होतो. भारतीय सैन्याच्या युद्धकैद्यांना तुरुंगात स्वतंत्र सेल, युद्धकैदी भत्ता वगैरे सोयी मिळत असतात. झाडझडती साठी अधिकारी येतात ते सुद्धा फक्त मानसिक दबाव टाकतात. चित्रपटात दाखवतात तसे युद्धकैद्यांची वर्णनं पुस्तकात नाहीत. सरबजीत वगैरे सारख्या सिनेमात दाखवतात तसली भडक टॉर्चर्स वगैरे नाही. एकूण इथपर्यंत कारभार संथ आहे आणि बहुदा तो तसाच होत असावा असं भारत आणि पाकिस्तान मधल्या युद्धकैद्यांचे रिपोर्ट्स वाचून अंदाज येतो.
भारतीय सैनिकांना जिथे ठेवलेले असते त्या तुरुंगाची भिंत आता ठिसूळ झाली असल्याचे आता भारतीय अधिकाऱ्यांना लक्षात येते. (शॉशांक रेडमशनची आठवण ?!)  युद्धकैदी भत्त्यातूनं रोजच्या वापरातल्या वस्तूं भारतीय अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या असतात त्या वापरून बाहेर पडण्याचा प्लॅन होतो.   तुरुंगाच्या समोर चित्रपटगृह असल्याने एक गर्दीची रात्र बाहेर पडायला निवडतात. आणि मोजकेच अधिकार बाहेर पडतात सुद्धा. १९७१च्या आज पासचा काळ चालू असल्याने स्वातंत्र्यापासून फार वर्ष झाली नाहीत.  भारतीय अधिकाऱ्यांनी पैदा केलेले  नकाशे सुद्धा जुनेच आहेत. ठिकाणांची बदललेली नाव  अधिकाऱ्यांना माहित नाहीत आणि पाकिस्तान हे ताजं "राष्ट्र" बनत असल्यामुळे पाकिस्तानी नव्या नावांबद्दल फार जागरूक असतात. आपल्या भारतीय अधिकाऱ्यांचा अफगाणिस्तान मार्गे जाण्याचा बेत बनतो. त्या साठी ते लंडी खाना ह्या पाकिस्तानी रेल्वे स्टेशनला लॅन्डमार्क मानून प्रवास करतात.  ते जेव्हा सतत  लंडी खाना ह्या स्थानकाचा उल्लेख करतात तेव्हा भुवया उंचावलेल्या बऱ्याच नजर त्यांच्या कडे वळतात. शंका येऊन भारतीय अधिकाऱ्यांची चौकशी होते आणि पकडले जातात.  भारतीय अधिकाऱ्यांना समजतं कि लंडी खाना नावाचं स्थानकं पाकिस्तान हा देश झाल्या पासून ओसाड पडलं आहे आणि त्याच्या आसपास काहीच नाही. नंतर काही दिवसात भारता बरोबर पाकिस्तानचास युद्धकैद्यांविषयी करार होऊन त्यांची मुक्तता होते. त्या सुमारास भारतात बातमी वगैरे होऊन प्रसिद्धी मिळाली असते. पुस्तकाची गोष्ट इथे संपते. सध्या भारत पाकिस्तान संबंध बरेच ताणले गेले आहेत, टीव्हीने तर आपल्याला युद्धाची चुणूक दिलीये. पाकिस्तान हे दहशतवादि राज्य आहे ह्यात काहिचं शंका असण्याचं कारण नाही पण पाकिस्तानातील प्रत्येक जण त्या कृत्यात सामील असेल हे मानण  सरसकटीकरण झालं.   परराष्ट्रीय संबंध, त्यातून युद्धकैदी कथा म्हणजे मनात एक साचेबंद तयार होतो. आततायी माध्यमं, उरफाटे लोक एका टोकाला आणि न्यूनगंडातमक शांततावादि दुसऱ्या टोकाला असं काहीसं चित्र डोळ्या समोर उभं राहतं. परराष्ट्रीय संबंध, युद्ध, कूटनीती ह्यात प्रत्यक्ष आणि सक्रिय सहभागी होणाऱ्या लोकांनी नैतिकता वेगळी असावी. त्या नैतिकतेचं दर्शन ह्या पुस्तकात नकळत होतं.
पुस्तकात भरपूर नकाशे, फोटोग्राफ्स, माहितीपत्रक आहेत. मांडण्याची पध्धत साधी असली तरी उत्कंठावर्धक आहे. लिखाण तांत्रिक माहिती जास्त नसल्यामुळे कोणालाही हे सहज वाचता येईल. शेखर गुप्तांनी ह्या पुस्तकाच्या मोहिमेत सामील झालेल्या अधिकाऱयांची मुलाखत ndvt साठी घेतली आहे.  त्या मुलाखतीत एक प्रश्नाचं उत्तर देताना, दिलीप परुळेकर हसत हसत म्हणाले."आमची सुटका होणार ह्याची आम्हाला खात्री होतीच पण तुरुंगातून पळून आपल्या देशात जाण्याची गोष्ट काही वेगळीच आहे." ह्याचं खुमखुमीसाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.

Comments

  1. Ninad,
    Sundar vishleshan. Ati bhadak ase filmi vatavarna peksha vastav he vegle aahe he aikun bare vatle

    ReplyDelete
  2. thank you, may i know your name please?

    ReplyDelete

Post a Comment