डॉ. आमटे चित्रपट

डॉ.आमटयांवरचा चित्रपट बघून निराशा झाली. मुळात त्याला "चित्रपट" म्हणाव का प्रश्न आहे. फार फार तर docudrama म्हणता येइल. नक्षलवादी आणि जवान ह्यांच्यातली चकमक हास्यास्पद चित्रित केलिय. कांबळे नावाचा अधिकारी आणि आम्बेडकरनवरचा विनोद सर्दृश्य सीन कोणत्य कारणासाठी? चित्रपटचा प्रचारकी चेहरा प्रत्येक सीन मध्ये दिसतो. पटकथा म्हणजे छोटे छोटे किस्से नरेशन मधून दाखवले आहेत. चित्रपटाची सुरवात आणि शेवट ह्याचा काहीही संबंध नाही. इतके वाईट घटक असेलतरी नाना पाटेकर यांचे संवाद आणि शैली जबरदस्त आहेत. लोकांनी सिनेमा बघावा तो फ़क्त नाना आणि डॉ. आमटे ह्यांच्या साठी. बाकी बोलण्यसारख काहीच नाहि.

Comments