पुणे ५२
पुणे ५२ बघितला. जगातिकीकरण, glasnost आणि perestroika केसरी आणि आकाशवाणीतून बघनार्या शहरी उच्चवर्णीय माणसाची गोष्ट. मराठीत फिल्म नोइर बघून खरच बर वाटलं. मी गिरीश कुलकर्णीचा फैन आहेच. सगळ्या फिल्म मधे रुपकं इतकी चपखल बसवली आहेतकी 1991-92 च्या काळात घेवुन जतात.
मराठी सिनेमा मधे रात्र होतचं नाही असं म्हंटल जायच कारण, सगळीकड़े प्रकाश, इथे अंधाराचा चांगला वापर केलाय.
अमर आपटेची मध्यमवर्गीय तथाकथित लाज आणि नवउच्च माध्यमवर्गी होवून आपल्याच अस्तित्वाला आलेला धोका व्यक्तिरेखे मधे दिसतो. अर्थव्यवस्थेमुळे बदलणारा समाज, त्या समाजाच्या नैतिकता आणि त्यांचे निकष हयात अमर आपटे अडकला आहे.
अमर आपटे हि व्यक्तिरेखा आहेच त्यापेक्षा 1991 नंतर ज्यांची जीवनमूल्य कमालीची बदलून गेली आहेत अश्या शेकडो लोकांचा प्रतिनिधि आहे. कामातून पैसा, पैश्यातून सामाजिक प्रतिष्ठा हा प्रवास बहुतेक लोकांचा असलेला प्रवास नजरेस येतो पण त्यात सुप्त वर्गवादी जाणीव झिड्कराली जाते. ती जाणीव हा चित्रपट करुन देतो.
भारतात खरे डिटेक्टिव फिक्शन किती आहेते माहित नाही पण व्योमकेश बक्षी सारख शर्लाक होम्स वरुन चोरलेलं पात्र, अमर आपटे नक्कीच नाही. गुप्तहेर असलातरी त्याची प्रतिमा लार्जर दँन लाइफ नाही, प्रसंगीतो चाचपडतो, घाबरतो पण थोडासाच. काळ कितीही बदलला तरीही जगण्याचे निकष त्याला तसेच हावे आहेत. Capitalism ते corny capitalism पर्यंतचा त्याचा प्रवास त्याच्या वैयक्तिक आयुष्याला छेद देवून जातो.
हा जेम्स बॉन्द, शर्लाक नाही हा अमर आपटे आहे, आणि त्यातच सिनेमाच यश आहे.
Comments
Post a Comment