पत्रिका

आमच्या कामवाल्या मावशींनी त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली. मी सहजच पत्रिका बघताना फार मजेशीर गोष्टी आढळल्या. निमंत्रक म्हणून १२० लोकांची नावं होती, सगळे पुरुष. प्रमुख पाहुणे असा कॉलम होता त्यात तीन-चार गावचे सरपंच होते, त्यात सुद्धा पुरुष सरपंचांची नावं आधी. व्यवस्थापक म्हणून "गाव देवी क्रिकेट क्लब"चं  छापलं  होतं. कार्यवाह म्हणून चाळीसएक मुलांची नाव होती. बाकी राहिलेल्या जागेत मेलेल्या लोकांसाठी (मृत वगैरे संबध कृत्रिम  वाटतात) श्रद्धांजली होती. 'छोट्यांचे आमंत्रण' म्हणून ९ ते १० मुलांची नावं होती.
गमतीचा भाग सोडला तर भारत समजून वगैरे घ्यायचा असेल तर अश्या गोष्टीं मधून जास्त समजतो. समाजातल्या एक थराला लग्न ही व्यक्तिगत गोष्ट समाजात आपलं स्थान पक्कं आणि अबाधित ठेवण्याची गरज वाटते. हे फक्त खालच्या वर्ग पुरतं मर्यादित नाही, हिंदी सिनेमा बघून त्या सारखी लग्न करणारा तथाकथित वरचा वर्ग आहेच. हे सगळं बघितला कि वाटतं, हे शिक्षणाचं अपयश की उत्सवाचा उन्माद!

ताजा कलम- पत्रिकेचा फोटो टाकायची इच्छा होती पण जे ह्या आभासी जगात (virtual word) नाहीत त्यांची उगाच बदनामी नको  म्हणून टाकत नाही.

Comments