हा खेळ बाहुल्यांचा! :)

पत्रकारितेच्या दुसर्या वर्षाला असताना संशोधनासाठी एका विषयाची निवड करायची होती तेव्हा, “Emoticons” म्हणजेच आपण कॉम्पुटर, SMS वरून बोलताना वापरणाऱ्या :) :-( सारख्या चिन्हांचा अभ्यास करायचं ठरवलं. लेखाला नाव देताना ढोबळमनाने emoticons ला बाहुल्य बोललं आहे; पण तरी emoticons हेच नाव संयुक्तिक ठरेल.
 बऱ्याच संधोधाकांचे शोध निबंध वाचताना लक्षात आलं की, भारतीय भाषां मध्ये काहीच साहित्य नाही, म्हणून जमेल तेवढी माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देण्यासाठी हा लेख.
Emoticons ला मराठी मध्ये नवीन नाव न ठेवता त्याच नावाने संबोधित करून त्यांचा जन्म कसा झाला ते बघू. स्कॉट फाल्ह्मान, हे संगणक संशोधक १९ सप्टेंबर १९८२ रोजी,यांनी गमतीत, कार्नेगी मेलॉन विद्यापीठाच्या मेसेजबोर्ड वर एक संदेश पाठवला होता त्यात, सर्वप्रथम emoticons चा वापर केला होता. मजेचा भाग असा की हे मेसेज गहाळ झाले आणि सापडले ते १० सप्टेंबर २००२ रोजी. 
emoticon चा शब्दशः अर्थ म्हणजे भावना व्यक्त करण्या साठी, हावभाव असलेली चिन्हे. दैनंदिन जीवनात आपण emoticons ना इतका ग्राह्य धरलंय की ते संगणकाच्या माध्यमातून संवाद साधण्याच्या व्याकरणात जावून बसले आहेत हेच आपण विसरतोय (म्हणजे वाक्य संपवताना पूर्णविरामाच्या जागी :) हे).  फेसबुक आणि whatsapp वर गप्पा मारताना नुसते शब्द वापरून संवाद निरस वाटू शकतो. त्याच्या ऐवजी अक्षरां बरोबर emoticons वापरले तर रंजकता वाढू शकते. समोरा समोर बोलताना, जसं चेहऱ्याच्या स्नायूनचा वापर करून आपलं म्हणणं, भावना अधिक चांगल्या प्रमाणे समोरच्या पर्यंत पोहचवता येतं;  तसंच emoticons चा वापर करून chatting करताना कराता येतं. ह्यात सुद्धा smilies आणि emoticons वेगळे बरं का! emoticons म्हणजे चेहर्याचे भाव दाखवणारे आणि smilies म्हणजे बाकी चिन्ह.
(वर दिलेले emoticons उदाहरनार्थ आहेत, असे आता बरेच उपलब्ध आहेत)
 तुम्हाला गंमत वाटेल  पण emoticons मध्ये सुद्धा बराच संवादाच्या अंगाने खूप नाही  तरी बर्यापैकी संशोधन  झालाय. अगदी, आपले बोलण्यातले हावभाव emoticons मध्ये येतात का? इथपासून ते, सर्वात जास्त emoticons कोण वापरतात? इथपर्यंत. एका संशोधनात तर असं आढळलं की, पुरुष हे महिलावर्गा पेक्षा अधिक emoticons  वापरतात, ह्याच्या मागचे साधं कारण म्हणजे सर्व तथाकथित प्रगत (?) समजात, पुरुषांनी भावना व्यक्त करणं हलक्या दर्ज्यच समजलं जातं! ह्याला पर्याय  म्हणून खाजगीबाब असणाऱ्या chatting मध्ये emoticons मधून भावना व्यक्त करणे.
ह्या emoticons मध्ये सुद्धा विविधता आढळते. जपान च्या emoticons, ईमोजि (emoji) मध्ये जास्तभर डोळ्यांच्या संवादावर असतो, उदारणार्थ >. <, ^.^ हे बघा आणि :) :( हे बघा, गूगलवर तुम्ही शोधलं तर असे बरेच फरक सापडू शकतील. वरच्या उदाहरणात पहिला प्रकार ईमोजि आहे, जपान सारख्या, बोलताना दुसरयाविषयी आदरभाव दाखवणाऱ्या संस्कृती मधून आलेले हे ईमोजी डोळ्यांनी जास्ती बोलतात. त्याच्या विरुद्ध म्हणजे नंतरचे अमेरिकन emoticons, ज्यात चेहरा दाखवण्यावर जास्त भर आहे.
emoticons च्या बाबतीत एक मजेशीर गोष्ट म्हणजे, सकारात्मक संवादा मध्ये emoticons वापर जास्त होतो, असा आढळून आलं आहे. रोजच्या जगण्यात आपल्याला कितीही त्रासिक चेहरा करून काम करावं लागलंतरी आभासी जगात उत्तम दिसावं हि तर ह्या मागची भावना नसेल? वापरकर्त्याला संवादासाठी स्वतंत्र आणि खाजगी वैयक्तिक जागा पुरवणाऱ्या chatrooms  ह्या नवीन व्यक्तिमत्व तयार करताना दिसतात. 
आपण बोलताना जसं जवळची व्यक्ती असलीतर अधिक मोकळेपणाने,  हातवारे करून बोलतो तसंच emoticons च्या बाबतीत. जेवढे नाते अधिक घट्ट तेवढा emoticons चा वापर जास्त. ह्यात एक नकारात्मक बाब अशी की, संवाद्कर्ता प्रत्यक्षात एखादी भावना न-अनुभवता ती emoticons द्वारे व्यक्त करू शकतो. भावना खरी की खोटी हे ओळखणे कठीण आहे. आभासी जगाचा थोडातरी प्रभाव ह्या तंत्रद्याना वर हवा ना ?
समोरच्याला चाचपडून संवाद चालू ठेवण्यसाठी emoticons ची गरज आहे, आणि ती वाढत राहणार आहे. क्रिश३ च्या वेळी सुद्धा त्या चित्रपटाचे smilies, facebook वर दाखल झाले होते. अर्थात बाजाराला सुद्धा emoticons, smilies प्रकारांची दखल घ्यावी लागते हे विशेष. शेवटीकाय समोर समोर कोणाला डोळा मारायचा झाला आणि मारता येत नसेल तर सरळ chatting करताना, ;) पाठवून द्यावे, एवढी सगळी पोपटपंची झाल्यावर आपलं काम झाल्याशी मतलब  :p
आता इथेच थांबतो, जसे नवीन मुद्दे वाचनात येतील तसे टाकत जाईन.

Comments