” मातोश्री वर अर्धी रात्र "
तेंडुलकरांनी
लघु कथे साठी राजकीय भाष्य करून समांतर इतिहास हा फॉर्म प्रथम मराठी मध्ये आणला
होता.
दुर्दैवाने ज्या काळात मध्ये ह्या कथा प्रकाशित झाल्या त्या काळात राजकीय दाबावा पोटी आणि राजकीय नेत्यान च्या दांभिक दैवाती करणा च्या मुळे ह्याना व्यासपीठ मिळाले नसावे
दुर्दैवाने ज्या काळात मध्ये ह्या कथा प्रकाशित झाल्या त्या काळात राजकीय दाबावा पोटी आणि राजकीय नेत्यान च्या दांभिक दैवाती करणा च्या मुळे ह्याना व्यासपीठ मिळाले नसावे
आपली कथा
मध्यमवर्गीय अशावादा मध्ये अडकून न ठेवता तेंडूलकर हे वास्तवाशी तोंड ओळख करून
 देतात
.ह्या कथा संग्रहां मधल्या बर्याच कथा आणि तेंडूलकर हे  जगलेले आयुष्य ह्यात साम्य आहे . प्रत्येक
कलाकृती हि कलाकाराने जगलेल्या घटनांचा अविष्कार असते असे म्हणतात पण तेंडूलकर
त्याची वास्तवा शी सांगड घालून तो मुद्दा अधिक नाट्यमय करतात .
मुंबईतला समाज
तेंडूलकर जितक्या ताकदीने उभे करतात , तो फार थोड्या लेखकांनी केला आहे.
मुखवट्या
मागचा माणूस तेंडुलकरांना बरोबर दिसतो , मातोश्री वारीन अर्धी रात्र घ्या गोष्टीचा विचार ह्या लेख
मध्ये करूया . एक सामान्य मासज वाला मातोश्रीवर साहेबां कडे ,ते देखील दस्तुरखुद्द साहेबांचा “आदेश “ आल्या वर जातो  आणि त्याच्या नजरेला ज्या गोष्टी दिसतात त्यांने
वर्णन आहे .हा मसाज वाला सेनेत नसलेला पण सामना वाचणारा आहे , साहेबांची भाषण ऐकणारा , त्यातून स्फूर्ती घेणारा
आणि साहेबांन बद्दल भयंकर आदर असलेला आहे .त्याला , त्याच्या
समाजात राहून मिळालेली आकलन शक्ती चे दर्शन तेंडूलकर सहज घडवतात.
बाळासाहेब आणि
मसाजवाला ह्या व्यक्ती आपले सामाजिक , आर्थिक , राजकीय वर्तुळ सोडून जेंव्हा ,
एकमेकांशी गप्पा मारतात तेव्हा जो संवाद होतो तो सर्व कृत्रिम
परिमाण ओलांडून नैसर्गिक होतो , जेंव्हा बाळासाहेब मसाज साठी
उघडे होतात तेव्हा त्यांचा कृश देह बघून महाराष्ट्राला आदेश देणारा हाच माणूस का
असा प्रश्न मसाजवाल्याला पडतो .
माणसाला माणूस म्हणून बघणारे
दृष्टीकोन फार कमी लोकांकडे आढळतात , स्वताला
अभिजन समाज्नार्यानकडे तर कमीच ,अश्या स्थितीत तेंडूलकर आणि
त्यांची पात्रे अगदी खरी आणि भाबडी वाटतात.नवीन अनुभव घेण्या साठी  वाचाच .


Comments
Post a Comment