भ्रष्टाचार मंदिरातला -
आपल्या राज्या मध्ये बरीच देवस्थान आहेत , बरेच भाविक  तिथे भेट देतात , तरी देवस्थानन ची अवस्था मनमोहन सरकार सारखी खराब झाली आहे .मंदिरांन  मध्ये बडव्यान चे राज्य असल्या चा भास बर्याच ठिकाणी होतो आहे .
मोठ्या मोठ्या मंदिरान मध्ये फोटो काढण्यास मनाई असते , ह्याला कारण  दिला जाता कि भाविकांनी देवा चा दर्शन  घ्यावा पण खरा कारण म्हणजे  बाहेर जे किरकोळ वस्तू विकण्य साठी ची दुकानं असतात त्या मध्ये बरेचदा बडव्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात .
मंदिरात भाविकांनी फोटो काढले तर बाहेर कोण फोटो विकत घेणार नाही म्हणून बहुदा मंदिरात फोटो काढण्यास बंदी असावी .
बर्याचदा हे पुजारी लोक भाविकांशी आतिशय अरेरावी ने  वागतात , देव आणि मंदिर ह्यां च्या बापाची property असल्या चा भाव ह्यां च्या थोबाडावर असतो , अतिशय मग्रुरी ने असे धर्ममार्तंड समाजाने एकत्रित आणि संघटीत प्रयत्न करून बदलले पाहिजेत .
कर्मकांडा शिवाय आणि नियमांन शिवाय देवळाचा कारभार करणे ह्या पुजारांनी शिकले पाहिजे .
एक अनुभव  सांगतो आम्ही जामनगर हून  सोमनाथ ला (गुजराथ मधील प्रसिद्ध शिव मंदिर ) गेलो होतो . पोहचायला दुपार झाली होती , मंदिरात गेलो तर व्यवस्थापनाने मंदिर बंद झाल्या चे सांगितले , आम्हाला सांगण्यात आले कि आता देवांची प्रसाद ची वेळ झाली आहे आम्हाला घाई असूनसुद्धा आम्ही ," ठीक आहे" बोलून निघालो,   तेवढ्या  मध्ये एक विदेशी जोडपे आलं त्यांनी पुजार्याला डॉलर  दिले , लागेल त्या लबाड पुजार्याने मंदिराचे दरवाजे स्वताच्या हातानी उघडून दिले . आता ह्याला  भ्रष्टाचार नाही तर की की बोलायचं ?
देवस्थान हे प्रबोधना ची केंद्र व्हावी , पुजार्यांनी उगाच लोक्कांवर हुशार्या  मारत बसण्या पेक्षा सामान्य भाविकांना मदत करावी , भाविक लांबून लांबून दर्शन साठी येतात त्यांना चांगल्या सुविधा देण्या चा प्रयत्न करावा , स्वता चा पगार वगळता दान पेटी मधल्या पैश्यान चा वापर हा मंदिरान मध्ये सोई कराव्या हीच नम्र विनंती
this photo is just for representational purpose

Comments